पशुधन निवारा शेड उभारण्याचा ठराव संमत पशुसंवर्धन समिती बैठक :
By Admin | Updated: November 30, 2014 00:55 IST2014-11-30T00:52:40+5:302014-11-30T00:55:05+5:30
पशुधन निवारा शेड उभारण्याचा ठराव संमत पशुसंवर्धन समिती बैठक :

पशुधन निवारा शेड उभारण्याचा ठराव संमत पशुसंवर्धन समिती बैठक :
नाशिक : नवीन पशुवैद्यकीय दवाखाना निर्माण करण्याच्या निकषात बदल करण्याची शासनाला शिफारस करण्यात यावी तसेच पशुधन निवाऱ्यासाठी शासनाने नवीन योजना सुरू करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. कृषी व पशुसंवर्धन समितीची मासिक बैठक सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. बैठकीत दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याबाबत त्यांच्या तक्रारीचा अहवाल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याच्या सूचना सभापती केदा अहेर यांनी दिल्या. बैठकीत समिती सदस्य निफाड पंचायत समिती सभापती सुभाष कराड यांनी करंजगाव येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना सुरू होण्याबाबत ठराव मांडला तोे संमत करण्यात आला. नवीन पशुवैद्यकीय दवाखाना निर्माण करण्याबाबत आदिवासी भागात पशुधन संख्येचा निकष तीन हजार असून, बिगर आदिवासी भागात हा निकष पाच हजार पशुधनाचा आहे. मात्र या निकषात बदल करून आदिवासी भागात पशुधनाच्या संख्येचा निकष ३००० ऐवजी १५००, तर बिगर आदिवासी भागातील ५००० हजारांऐवजी ३००० पशुधनाचा निकष ठेवण्यात यावा,असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. नाशिक, कळवण, सुरगाणा, निफाड या तालुक्यांत पशुवैद्यकीय दवाखाने इमारती मंजूर असून, या मंजूर दवाखान्यांसाठी जागा उपलब्ध नसल्याने या जागा उपलब्ध करून घेण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी,असे आदेश सभापती केदा अहेर यांनी दिले. त्याचप्रमाणे महाबीजने १२५ कोेटी रुपयांचे बियाणे फक्त टंचाईसदृश तालुक्यांमध्ये वितरीत केल्याबाबतची माहिती बैठकीत दिली. या बियाण्यांमध्ये मका, ज्वारी व न्युट्रेफिड या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.