अनिल कदम यांचे निफाड तालुक्यावर पुन्हा वर्चस्व

By Admin | Updated: October 20, 2014 00:15 IST2014-10-19T23:08:10+5:302014-10-20T00:15:18+5:30

अनिल कदम यांचे निफाड तालुक्यावर पुन्हा वर्चस्व

Anil Kadam's dominance over Niphad taluka | अनिल कदम यांचे निफाड तालुक्यावर पुन्हा वर्चस्व

अनिल कदम यांचे निफाड तालुक्यावर पुन्हा वर्चस्व

लासलगाव : निफाड मतदारसंघात अनिल कदम सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे. कदम यांनी मतदारांशी संपर्क व विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच त्यांना मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राजकीय रणसंग्रामात शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बनकर यांच्यावर ३९२१ अशा मताधिक्याने मात केली आहे. येथे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत पहावयास मिळाली आहे. राज्यात सर्वत्र मोदी लाटेने राजकीय त्सुनामी लाटेचा कुठलाच प्रभाव निफाडमध्ये जाणवला नसल्याचे भाजपाचे उमेदवार वैकुंठ पाटील यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे. वैकुंठ पाटील यांना १८ हजार २१ मते मिळाली तर काँग्रेसही प्रभावहीन झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मोगल यांना अवघे पाच हजार ८७१ मते मिळाली, तर मनसेचे अस्तित्वच या निवडणुकीत जाणवले नाही. मनसेचे सुभाष होळकर यांना केवळ एक हजार ३६० इतकी कमी मते मिळाली. यंदा गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे आठ टक्के मतदान जास्त झाले. त्यामुळे हे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते.
मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच कदम-बनकर यांच्यात चुरशीची लढाई दिसून आली. दहाव्या फेरीपर्यंत बनकर आघाडीवर होते. मात्र अकराव्या फेरीपासून कदम यांनी जोरदार आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. अखेर शेवटच्या फेरीमध्ये अनिल कदम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बनकर यांच्यावर तीन हजार ९२१च्या मताधिक्याने मात करत पुन्हा एकदा निफाड मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकाविला. मुख्य निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे व सहायक निवडणूक अधिकारी डॉ. संदीप अहेर यांनी निकाल जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांसह कदम समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकाच जल्लोष साजरा केला. यावेळी निफाड, पिंपळगाव, ओझर शहरात शिवसेनेचे अनिल कदम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार मंदाकिनी कदम, ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड, यतिन कदम, राजेंद्र डोखळे, उत्तम गडाख, सुधीर कराड, मुकुंद होळकर, जावेद शेख, वाल्मीक कापसे, बापू कुंदे, संजय कुंदे यांसह कदम समर्थक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Anil Kadam's dominance over Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.