अनिल कदम यांच्याकडून ठेकेदारास मारहाण

By Admin | Updated: July 8, 2017 01:17 IST2017-07-08T01:17:29+5:302017-07-08T01:17:42+5:30

नाशिक : आमदार अनिल कदम यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ठेकेदार भिडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़

Anil Kadam assaulted the contractor | अनिल कदम यांच्याकडून ठेकेदारास मारहाण

अनिल कदम यांच्याकडून ठेकेदारास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एसटी महामंडळाच्या निविदांच्या कारणावरून निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदार भिडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ तर अनिल कदम यांनीही बांधकाम ठेकेदाराने शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे़
ठेकेदार अनिल इंद्रजित भिडे (२७, इंद्रजित अपार्टमेंट, सहदेवनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यालयात आमदार अनिल साहेबराव कदम (रा़ओझर, ता़ निफाड) यांनी एसटी महामंडळाच्या निविदांच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली़ भिडे यांच्या तक्रारीवरून आमदार कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आमदार कदम व भिडे या दोघांविरोधात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्णाची नोंद केली आहे़

Web Title: Anil Kadam assaulted the contractor