संतप्त जमावाने पेटविली पीकअप
By Admin | Updated: October 27, 2015 23:13 IST2015-10-27T23:13:13+5:302015-10-27T23:13:37+5:30
संतप्त जमावाने पेटविली पीकअप

संतप्त जमावाने पेटविली पीकअप
कळवण : नाशिककडून कळवणकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पीक अप मालवाहतूक गाडीने मानूरच्या शासकीय विश्रामगृहाजवळ मोटारसायकल चालकाला उडवल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याने संतप्त जमावाने बेहडी पूलाजवळ अपघातास जबाबदार ठरलेले वाहन पेटवून दिले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाला देखील धक्काबुकी केल्याचे समजते
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी नासिककडून कळवणकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पीकअप मालवाहतूक एम एच ११ टी ६८६५ या वाहनाने शासकीय विश्रामगृहाजवळ मोटारसायकल स्वाराला उडवल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक भैय्या पाटील रा मानूर हा जागीच ठार झाला. अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याचे समजतात संतप्त झालेल्या जमावाने बेहडी पूलाजवळ पीकअप मालवाहतूक गाडी अडवून वाहनचालकासह गाडीला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला मात्र संतप्त जमावाने पूलावर वाहन पेटवून दिले. अपघातात मृत्युमुखी पडलेला भैय्या पाटील हा मानूर येथील रहिवासी असून मानूरच्या पवार परिवाराचा भाचा होता. (वार्ताहर)