वाहनधारकांमध्ये नाराजी : डागडुजी न करता रुंदीकरणाची मागणी
By Admin | Updated: November 21, 2014 23:21 IST2014-11-21T23:21:03+5:302014-11-21T23:21:36+5:30
वाहनधारकांमध्ये नाराजी : डागडुजी न करता रुंदीकरणाची मागणी

वाहनधारकांमध्ये नाराजी : डागडुजी न करता रुंदीकरणाची मागणी
जउळके-वणी मुख्य रस्त्याची अवस्था दयनीयवरखेडा : दिंडोरी तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या लखमापूर फाटा ते कादवा कारखाना मार्गे जउळके-वणी या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, केवळ डागडुजी न करता रस्त्याचे रूंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे.
लखमापूर फाटा ते कादवा सहकारी कारखान्यामार्गे मुंबई-आग्रा राज्य महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून जैसे-थे असून, लोकप्रतिनिधींनी देखील दखल घेतली गेली नसल्याने वाहन धारक व प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील हा मुख्य रस्ता असून, या मार्गाने गुजरात राज्यातील भाविक शिर्डीला याच मार्गाचा अवलंब करतात. त्याच प्रमाणे शेतकरी वर्गही शेतीमाल व कादवा सहकारी साखर कारखाण्यावर ऊस तोडी कामगारांना उसाची वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण झाले नसून केवळ डागडुजी करूनच बोळवण केली जाते. दरवर्षी कादवा कारखान्यावरील गळीत हंगामात शुभारंभ प्रसंगी येण्याऱ्या मंत्री महोदयांच्या स्वागतासाठीच तात्पुरती डागडुजी करण्याची पद्धत नव्याने नसून या वर्षभरात तालुक्यातील
विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदि मंत्री आल्यावरच रस्त्याचे काही अंशी भाग्य उजळते.(वार्ताहर)