शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त दुचाकीचालकाची पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:30 IST

रुग्णालयात जात असताना दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर पोलिसाने अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने पोलिसाला धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास समज दिल्यानंतर वाद मिटला.

नाशिकरोड : रुग्णालयात जात असताना दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर पोलिसाने अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने पोलिसाला धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास समज दिल्यानंतर वाद मिटला.प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार नाशिक-पुणे महामार्गावरील गुरूद्वारासमोर शुक्रवारी दुपारी शहर वाहतूक शाखेकडून विनाहेल्मेटधारी दुचाकीचालकावर कारवाई करण्यात येत होती. यावेळी रुग्णालयात नातेवाईकाकडे जाणाऱ्या दुचाकीचालकास वाहतूक पोलिसांनी अडवून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. दंड न भरणाºया दुचाकी जमा करण्यासाठी टोर्इंगची गाडीही बोलविण्यात आली. टोर्इंग वाहनावरील कर्मचारी आल्यानंतर पोलिसाचा आवाज आणखीनच वाढल्याने वाद अधिक पेटला. रुग्णालयात जाणे महत्त्वाचे असल्याचे दुचाकीस्वार जीव तोडून सांगत असतानासुद्धा वाहतूक पोलिसाकडून अर्वाच्च बोलणे सुरूच होते. यावेळी बघ्यांनीदेखील त्या कर्मचाºयास समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर तेथे आलेल्या पोलीस अधिकाºयाने मध्यस्ती केल्यानंतर वाद मिटला. त्यानंतर संबंधित अधिकाºयाने त्या वाहतूक पोलिसालादेखील चांगलेच सुनावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.वाहतूक शाखेकडून थेट दंडात्मक कारवाईवरच भर दिला जात असल्याने दुचाकीचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अशाच प्रकारचे वाद घडत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी