नाराज उमेदवार, अपक्षांचे होणार पॅनल
By Admin | Updated: February 7, 2017 22:54 IST2017-02-07T22:54:01+5:302017-02-07T22:54:19+5:30
नाराज उमेदवार, अपक्षांचे होणार पॅनल

नाराज उमेदवार, अपक्षांचे होणार पॅनल
नाशिकरोड : मनपा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारलेले नाराज, अपक्ष व काही पक्षांचे उमेदवार असे सर्वजण मिळून पॅनल बनवून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत, तर पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार आपल्या पक्षातील नाराजांना राजी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना, भाजपाकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाल्याने तेथेच नाराज झालेल्यांची संख्या मोठी आहे, तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये काही चुरस नव्हती. उलट काही प्रभागांतील काही गटात उमेदवारच नाही मिळाल्याने त्या ठिकाणी त्यांचे पॅनल होऊ शकले नाही. भाजपा, शिवसेनेकडून दावेदार असलेले मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने काहीजणांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन अधिकृत उमेदवार झाले आहेत. मात्र बहुतांश इच्छुक आपली नाराजी शब्दातून अत्यंत प्रखरपणे सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करत आहे. त्यातील काहीजण बंडखोरी न करता उमेदवारी अर्ज मागे घेतील असे चित्र दिसत आहे. मात्र उमेदवारी न मिळालेले काहीजण कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची या भूमिकेत आहेत ते अपक्ष जेथे पक्षाच्या उमेदवारांचे पॅनल पूर्ण नाही त्या पक्षाच्या उमेदवारांना सोबत घेऊन पॅनल करून निवडणूक लढविण्याचे नियोजन केले जात आहे. जेलरोड प्रभाग १८ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष, मनसे, अपक्ष असे चार उमेदवारांचे पॅनल जवळपास झाले आहे, तर प्रभाग १७ मध्ये रिपाइं आठवले गट व भाजपाची उमेदवारी न मिळालेले नाराज अशा दोघांचे पॅनल आजमितीला निश्चित झाले आहे.