अफ वा बिबट्याची़ ़ ़निघाले उद्मांजर

By Admin | Updated: May 11, 2014 20:07 IST2014-05-11T19:02:44+5:302014-05-11T20:07:48+5:30

गजपंथजवळील गायकवाड मळ्यात दुर्मीळ पाचफु टी उद्मांजर

Anghagala Urmanger | अफ वा बिबट्याची़ ़ ़निघाले उद्मांजर

अफ वा बिबट्याची़ ़ ़निघाले उद्मांजर

गजपंथजवळील गायकवाड मळ्यात दुर्मीळ पाचफु टी उद्मांजर
पंचवटी : म्हसरूळजवळच्या गजपंथनगर परिसरातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची जोरदार अफ वा रविवारी सकाळी परिसरात पसरली़ या घटनेमुळे वन विभाग आणि पोलीस, अग्निशमन दल असा सर्व लवाजमा घटनास्थळी पोहोचला़ या ठिकाणी आल्यानंतर काढलेल्या छायाचित्रातून तो बिबट्या नसून उद्मांजर असल्याचे वनपालांनी सांगितले़ गायकवाड यांच्या विहिरीत पडलेले उद्मांजर हा दुर्मीळ प्राणी असून, तो किमान पाच फू ट लांबीचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे़
म्हसरूळ परिसरातील गजपंथजवळ माधव गायकवाड यांचे शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास विहिरीतून टँकरमध्ये पाणी भरत असताना टँकरचालक बाळू बोंबले यास बिबट्यासारखा प्राणी दिसला़ त्याने तत्काळ ही बाब संजय गायकवाड यांना सांगितली़ त्यांनी या मुक्या प्राण्याचा जीव वाचावा यासाठी विहिरीतील पाणी बाहेर काढून अग्निशमन विभाग तसेच वन अधिकार्‍यांना माहिती दिली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल एम़ एस़ वनपाल, वनरक्षक यू़ बी़ पाटील, एस़ पी. थोरात तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले़
विहिरीत डोकावूनही काही दिसत नसल्याने सकाळी महापालिकेचे इंजिनिअर अविनाश धनाईत यांनी मोबाइलमध्ये काढलेल्या फ ोटोवरून ते उद्मांजर असल्याचे गोसावी यांनी सांगितले़ हा प्राणी नखांच्या साहाय्याने विहिरीबाहेर पडू शकतो, असेही गोसावी यांनी सांगितले़ दरम्यान, अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर त्यांचे एक वाहनही घटनास्थळी पोहोचले़ मात्र हे उद्मांजर विहिरीच्या कपारीत जाऊन बसल्याने दिसून आले नाही़ (वार्ताहर)

--इन्फ ो--
जीव वाचविण्यासाठी धडपड
सकाळी दहा वाजेच्या सुमारास विहिरीत अर्धवट स्थितीतील उद्मांजर टँकरचालक बाळू बोंबले यास दिसले़ यानंतर विहिरीजवळ स्वत: जाऊन पाहिल्यानंतर त्याचा जीव वाचावा यासाठी प्रथम अग्निशमन विभाग आणि नंतर वन विभागाला माहिती दिली़ त्यानुसार हे सर्व अधिकारी घटनास्थळी आले़
- संजय गायकवाड, शेतमालक, म्हसरूळ

--इन्फ ो--
बिबट्या नसून उद्मांजर
गायकवाड यांच्या मळ्यातील विहिरीत पडलेले उद्मांजर हे कपारीत घुसून बसलेले असल्याने पाहणार्‍याला तो बिबट्या असल्याचा भास झाला़ मात्र ते उद्मांजर असून, विहिरीतून त्याला बाहेर पडता येते़ पाण्याच्या किंवा अन्य खाद्याच्या शोधात ते विहिरीत पडले असण्याची शक्यता आहे़
- एम़ एस़ गोसावी, वनपाल, नाशिक

फ ोटो :- ११ पीएचएमए ६५
म्हसरूळ परिसरातील गजपंथजवळील माधव गायकवाड यांच्या विहिरीत पडलेले उद्मांजऱ

Web Title: Anghagala Urmanger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.