सीसीटीव्ही बसविल्याचा राग धरून कार पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST2021-01-18T04:13:52+5:302021-01-18T04:13:52+5:30

याप्रकरणी संतोष काशीनाथ नागरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नागरे हे संशयित गुरव यांच्याशेजारी राहतात. नागरे यांनी इमारतीत ...

Angered by the installation of CCTV, the car caught fire | सीसीटीव्ही बसविल्याचा राग धरून कार पेटविली

सीसीटीव्ही बसविल्याचा राग धरून कार पेटविली

याप्रकरणी संतोष काशीनाथ नागरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नागरे हे संशयित गुरव यांच्याशेजारी राहतात. नागरे यांनी इमारतीत सीसीटीव्ही बसवल्याचा राग मनात धरून संशयित गुरव यांनी शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नागरे यांच्या भाच्याच्या स्विफ्ट कारवर (एमएच १ व्हीए ०४६२) ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----

गंगापूरला महिलेची राहत्या घरात आत्महत्या

नाशिक : राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन घेत महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १६) रात्री गंगापूर शिवारात घडली.

मनीषा शंकर वसावे (२३, रा. पाटील चाळ, गंगापूर गाव) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात वसावे यांनी छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Angered by the installation of CCTV, the car caught fire