क्रोध, लोभावरील विजयाचे सूत्र गीतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:39 PM2020-01-10T23:39:40+5:302020-01-11T01:25:11+5:30

सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृष्ट गुरू असल्याचे प्रतिपादन भगवद््गीता अभ्यासक डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

Anger, the source of victory over greed in the song | क्रोध, लोभावरील विजयाचे सूत्र गीतेत

क्रोध, लोभावरील विजयाचे सूत्र गीतेत

googlenewsNext
ठळक मुद्देमालपाणी : ‘सहज सोपा मार्ग यशाचा’ विषयावर व्याख्यान

नाशिक : सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृष्ट गुरू असल्याचे प्रतिपादन भगवद््गीता अभ्यासक डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
येथील प. सा. नाट्यगृहात सावानाच्या वतीने आयोजित ‘सहज सोपा मार्ग यशाचा’ या तीन दिवसीय व्याख्यानमालेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जीवनातील कोणतीही समस्या कशी हाताळायची, आपला तोल कसा ढळू द्यायचा नाही त्याचे सार गीतेत सांगितले आहे. कितीही गंभीर प्रसंग आला तरी चेहऱ्यावरील स्मित आणि मनातील शांतता ढळू देऊन नका. अर्ध्याहून अधिक समस्या तर त्यामुळेच संपुष्टात येतील. यावेळी व्यासपीठावर प्रा. विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, अभिजित बगदे, नरेंद्र महाजन, श्रीकांत बेणी, देवदत्त जोशी, शंकर बर्वे आदी उपस्थित होते. क्रोधावर नियंत्रण मिळवणे, ही यशाची पहिली पायरी असते. समोरच्या व्यक्तीने कशाही प्रकारे वाकताडन केले तरी आपण शांत चित्ताने त्याचे म्हणणे ऐकून त्यावर शांतपणे प्रतिक्रिया दिल्यास त्या क्षणी होणारा वाद, भांडाभांडीचे कारणच संपुष्टात येते. सर्वप्रथम प्रत्येकाला आपापल्या श्वासावर नियंत्रण मिळवता यायला हवे असे मालपाणी म्हणाले.

Web Title: Anger, the source of victory over greed in the song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.