शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:51 IST

महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये यामागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.

नाशिक : महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये यामागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.  बंद पडलेल्या अंगणवाडी सेविकांनी मनपाच्या प्रवेशद्वारावरच आमरण उपोेषण सुरू केले आहे. बुधवारी (दि. १९) झालेल्या महासभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्येवर भर दिला. गेल्या महिन्याच्या महासभेत आदेश देऊनही प्रशासन याबाबत अंमलबजावणी करीत नसल्याने महासभेतील निर्णयांचा काय उपयोग, असा प्रश्न नगरसेवकांनी केला.  अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अखेरीस महापौर रंजना भानसी यांनी अंगणवाडी सेविकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देतानाच गेल्या महासभेत ठरल्यानंतर पटसंख्येनुसार फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा