शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पिंपळगावी अंगणवाडी सेविकांनी पिकविला सेंद्रिय भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:51 IST

पिंपळगाव बसवंत : येथील ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातून शहरात ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्यात येत असून त्या अंगणवाडीच्या आवारात सेविकांकडून विविध प्रकारचा विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे संतुलित पर्यावरण राखण्यासाठी मदत होणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीतर्फे वसुंधरा अभियान, संतुलित पर्यावरण राखण्यासाठी पुढाकार

पिंपळगाव बसवंत : येथील ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातून शहरात ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्यात येत असून त्या अंगणवाडीच्या आवारात सेविकांकडून विविध प्रकारचा विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे संतुलित पर्यावरण राखण्यासाठी मदत होणार आहे.पिंपळगाव ग्रामपालिकेने ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानाअंतर्गत शहरातील अंगणवाडी आवारात पालक, शेपू, कोथिंबीर, कांदापात, मेथी, फ्लॉवर आदी सेंद्रिययुक्त पालेभाज्यांच्या रोपांची लागवड केली होती. नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व तसेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा (सेंद्रिय भाजीपाला) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका उज्ज्वला कागदे यांच्याकडून भाजीपाला रोपावर नियमित सेंद्रिय पद्धतीच्या औषधांची फवारणी करून निगराणी राखली जात असल्याने विशेष म्हणजे या रोपांचे भाजीपाल्यात रूपांतर झाल्याने ताजा विषमुक्त भाजीपाला तयारदेखील झाला. अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून तयार झालेला भाजीपाला गोरगरीब नागरिकांना मोफत वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसून आला.शहरात ठिकठिकाणी उद्यान गार्डन उभारण्यात आले असून स्मार्ट शहर म्हणून पिंपळगावची ओळख हळूहळू होत आहे. त्यासाठी निसर्गासोबत वसुंधरा अभियानअंतर्गत मैत्री करून शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. त्यात झाडे लावा, निसर्ग वाचवा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निरोगी जीवन, त्यासाठी असलेली नियमित स्वछता ठेवा, असे आवाहन देखील नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे.-गणेश बनकर, ग्रामपालिका सदस्य, पिंपळगावविषमुक्त आहार नक्की मिळणारशहरातील संपूर्ण अंगणवाडी परिसरात परसबागा उभारून विषमुक्त भाजीपाला तयार करण्यात येत आहे. अंगणवाड्या सुरू झाल्यावर नक्कीच त्याचा फायदा शाळेतील बालकांना होणार असून विषमुक्त आहार मिळणार आहे. त्यामुळे इतर ग्रामपालिकांनीही या अभिनय उपक्रमांची दखल घेऊन ही मोहीम राबविणे गरजेचे आहे.पिंपळगाव शहरातील अंगणवाडी परिसरात उभारलेल्या परसबागांमध्ये काम करताना सेविका. (२१ पिंपळगाव १)

टॅग्स :agricultureशेतीSocialसामाजिक