शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 02:14 IST

पालिकेच्या महासभेत अंगणवाड्या बंद करण्याचा विषय तापला

नाशिक: महापालिकेने बंद केलेल्या 136 अंगणवाडीमधील सेविकांनी दोन दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण आज मध्यरात्री 1 वाजता मागे घेतले. महापौर रंजना भानसी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्याचे फेर सर्वेक्षण करण्यात येईल तसेच या सेविका आणि मदतनीस यांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल, या अटींवर हे उपोषण समाप्त करण्यात आले. मंगळवारपासून मनपा मुख्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे आमरण उपोषण सुरू होते.महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत आज पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये, या मागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. बंद पडलेल्या अंगणवाड्यांमधील सेविकांनी मनपाच्या प्रवेशद्वारावरच आमरण उपोषण सुरू केल्याने त्याचे तीव्र पडसाद आज महासभेत उमटले. सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्येवर भर दिला. गेल्या महिन्याच्या महासभेत आदेश देऊनही प्रशासन याबाबत अंमलबजावणी करत नसल्याने महासभेतील निर्णयांचा काय उपयोग, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अखेरीस महापौर रंजना भानसी यांनी अंगणवाडी सेविकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिला. आमरण उपोषणादरम्यान पाच अंगणवाडी सेविकांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक