... अन् तपोवन एक्स्प्रेस डबे सोडून पुढे निघाली

By Admin | Updated: April 12, 2017 00:46 IST2017-04-12T00:45:49+5:302017-04-12T00:46:03+5:30

... अन् तपोवन एक्स्प्रेस डबे सोडून पुढे निघाली

... and Tapovan went ahead leaving the express trains | ... अन् तपोवन एक्स्प्रेस डबे सोडून पुढे निघाली

... अन् तपोवन एक्स्प्रेस डबे सोडून पुढे निघाली

मनमाड : नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेचे चार डबे मागे सोडून वेगाने पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी घडली. सदर प्रकार गार्डच्या लक्षात आल्यानंतर तुटलेले डबे जोडण्यात आले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. या घटनेमुळे गाडीला अर्धा तास विलंब झाला.
नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसने मंगळवारी सायंकाळी मनमाड रेल्वेस्थानक सोडल्यानंतर रेल्वेच्या बंधाऱ्याजवळ गाडी थांबल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने पाहणी केली असता गाडीचे मागचे चार डबे थांबलेले दिसले. उर्वरित डबे घेऊन गाडी पुढे निघुन गेल्याचे समजताच त्यांनी चालकाशी संपर्क साधत डबे मागे राहिल्याची माहिती दिली. चालकाने गाडी थांबवून मागे आणली. रेल्वे कर्मचाऱ्यानी देखील घटनास्थळी धाव घेतली. अर्धा तासाच्या विलंबाने गाडी मुंबईला रवाना झाली. (वार्ताहर)

Web Title: ... and Tapovan went ahead leaving the express trains