शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

... अन् रोहित पवार कार्यकर्त्याच्या बुलेटने पोहोचले थेट मैदानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:59 IST

राजकीय नेते व्यासपीठावरून अनेकदा राजकीय टोलेबाजी करीत आखाडा गाजवत असतात.  राजकीय आखाड्यात असे अनेक दिग्गज आहेत की त्यांच्या राजकीय फटकेबाजीने टाळ्या आणि हशांची बरसात होते.   या फळीतील तसे नवखे, परंतु तरबेज असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारदेखील राजकारणाच्या मैदानावर अनेकदा टोलेबाजी करताना दिसतात.  नाशिक दौऱ्यातही त्यांच्या फटकेबाजीचा अनुभव आला; परंतु ही फटकेबाजी काही राजकीय व्यासपीठावरील नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरील होती.

ठळक मुद्देक्रिकेटच्या मैदानातही केली तुफान टोलेबाजी खेळणाऱ्या मुलांनाही आला हुरूप

नाशिक : राजकीय नेते व्यासपीठावरून अनेकदा राजकीय टोलेबाजी करीत आखाडा गाजवत असतात.  राजकीय आखाड्यात असे अनेक दिग्गज आहेत की त्यांच्या राजकीय फटकेबाजीने टाळ्या आणि हशांची बरसात होते.  या फळीतील तसे नवखे, परंतु तरबेज असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारदेखील राजकारणाच्या मैदानावर अनेकदा टोलेबाजी करताना दिसतात.  नाशिक दौऱ्यातही त्यांच्या फटकेबाजीचा अनुभव आला; परंतु ही फटकेबाजी काही राजकीय व्यासपीठावरील नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरील होती.      रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार हे देवळाली कॅम्प येथील कार्यक्रम आटोपून कारने नाशिकरोडकडे परतत असताना विहितगावजवळ त्यांना कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी थांबविले. कार्यक्रम स्थळापासून थोडे दूर महापालिकेच्या मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विक्रम कोठुळे यांना मैदानावर घेऊन चला असे म्हणत त्यांच्या बुलेटवर बसले आणि मैदानावर पोहोचले. यावेळी नेते, कार्यकर्ते, बंदोबस्तावरील पोलीस सारेच मैदानाकडे धावले. मैदानावर पोहोचताच पवार यांनी बॅट हातात घेतली आणि सुरू केली फटकेबाजी. पंधरा मिनिटे त्यांनी मैदानाच्या चारही दिशेने चेंडू टोलविले आणि कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळविल्या. मुलांनाही चांगलाच हुरूप आला होता. त्यांनीही एकेक करीत आवर्जून रोहित पवारांसमोर गोलंदाजी केली. काही कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना गोलंदाजी केली. कार्यकर्त्यांचा चेंडू आणि नगरसेवकाने टिपला झेलआमदार रोहित पवार फलंदाजी करीत असताना त्यांच्या पाठीमागे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विक्रम कोठुळे यांनीही पवारांसमोर षट‌्क टाकले आणि त्यांचा झेल नगरसेवक जगदीश पवार यांनी टिपला. 

टॅग्स :NashikनाशिकRohit Pawarरोहित पवार