...अन् लासलगावच्या यात्रेकरूचे वाचले प्राण
By Admin | Updated: July 15, 2016 02:07 IST2016-07-15T01:59:10+5:302016-07-15T02:07:54+5:30
पक्षघाताचा झटका : मिळाली तातडीची मदत

...अन् लासलगावच्या यात्रेकरूचे वाचले प्राण
लासलगाव : पिंपळगाव नजीक येथील रहिवासी सुधाकर लहान भोर हे अमरनाथ यात्रेहून परततांना त्यांना पक्षघाताचा झटका आला. त्यांना तातडीने नाशकात आणून उपचार केल्याने त्यांचा जीव वाचू शकला.
लासलगाव येथील भाविक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात. यंदा सुधाकर भोर हे इतर भाविकांसोबत अमरनाथ यात्रेला गेले होते. दरम्यान भोर यांना बाबा अमरनाथ दर्शन घेऊन परततांना अचानक पक्षघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती बरीच खालावली. त्यांच्यावर लष्करी दवाखान्यात उपचार सुरू झाले. त्यातच अतिरेकी कारवायांमुळे जम्मू काश्मीर राज्यातील इंटरनेट व फोन बंद पडल्यानंतर संपर्कहोणे शक्य झाले नाही. बुधवारी रात्री ब्राम्हणगाव विंचूरचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गवळी यांना ही माहिती समजताच शिवसेना गटप्रमुख शिवा सुरासे यांच्याशी संपर्क साधला. गवळी व सुरासे यांनी खासदार
हरिश्चंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. चव्हाण यांनी तातडीने त्यांचे दिल्ली येथील स्वीय सहाय्यक डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी भोर यांच्यावर उपचार सुरू असलेल्या श्रीनगर येथील हॉस्पीटलमध्ये विचारपूस केली. (वार्ताहर)