...अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By Admin | Updated: July 17, 2017 00:17 IST2017-07-16T23:39:10+5:302017-07-17T00:17:31+5:30

पंचवटी : वेळ दुपारी तीन वाजेची...स्थळ तपोवनातील केवडीबन समोरील गोदावरी नदीपात्र. सगळ्यांच्या नजरा गोदावरी नदीपात्रात वाहून आलेल्या त्या बॉक्सवर .

... and the police left the rescue | ...अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

...अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : वेळ दुपारी तीन वाजेची...स्थळ तपोवनातील केवडीबन समोरील गोदावरी नदीपात्र. सगळ्यांच्या नजरा गोदावरी नदीपात्रात वाहून आलेल्या त्या बॉक्सवर ..प्लॅस्टिक दोरीने बांधलेल्या त्या बॉक्समध्ये नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सुक होते. घटनास्थळी पोलीसही पोहचले होते. दोरीने आवळलेल्या त्या बॉक्समध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद आढळून येणार असे वाटत असतानाच पोलिसांनी एका नागरिकाच्या मदतीने तो बॉक्स उघडला अन् पोलिसांसह उपस्थित असलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. बॉक्सकडे उत्सुकतेने बघत जमलेल्या नागरिकांनी बॉक्स उघडताच त्यातील गादी कुशन्स बघून काढता पाय घेतला. शनिवारी (दि.१५) दुपारी तपोवनातील केवडीबन येथे असलेल्या गोदावरी नदीपात्रात एक प्लॅस्टिक गुंडाळलेला बॉक्स पाण्यात वाहून आला व तो बॉक्स दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत असल्याने त्यात काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही वेळातच पंचवटी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पाण्याने वाहून आलेला बॉक्स किनाऱ्यावर आल्याने त्यात काहीतरी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली तो पावेतो घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी अखेर एका इसमाला कथड्यावरून खाली उतरविले व वाहून आलेल्या बॉक्सचा दोर त्या इसमाने कापून त्यावरील प्लॅस्टिक हटविले असता त्यात गादीसाठी लागणारे तीन ते चार कुशन्सचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी चौकशी करत त्या बॉक्समध्ये काही संशयास्पद वस्तू मिळून न आल्याची माहिती वरिष्ठांना कळवून माघारी फिरले.

Web Title: ... and the police left the rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.