...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

By Admin | Updated: March 26, 2015 00:42 IST2015-03-26T00:41:58+5:302015-03-26T00:42:02+5:30

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

... and LBT filling stop from April 1! | ...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !


जालना : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या सारख्याच आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या आहेत. संघटनेच्या या मागण्या लवकरच मार्गी लागतील, असे ठोस आश्वासन केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिले.
यावेळी जिल्हा संघटनेच्या एका शिष्टमंडळाने पासवान यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलतांना पासवान म्हणाले की, देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या असलेल्या अडचणींवर केंद्र गांभीर्याने विचार करत आहेत. अन्न- धान्य गोरगरीबांपर्यत पोहचविण्यासाठी केंद्र सरकार स्वस्त धान्य दुकानदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. संघटनेच्या असलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या सरकारने यापूर्वीच प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांना दहा हजार रुपये मासिक वेतन, संपूर्ण भारतात एकच कमिशन दर आणि तोही ८७ रुपये प्रतिक्विंटल, व्दारपोच धान्य पुरवठा करणार, येत्या मे महिन्यापासून बारकोड पध्दतीस सुरुवात करणार आदी बाबींवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केलेला आहे. वरील सर्व योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचेही श्री. रामविलास पासवान यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, तसेच प्रल्हाद वाघोली, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव, प्रभाकर पाडळ, शरद कारेवार आदींसह महाराष्ट्र राज्य संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संघटनेच्या या मागण्यांना खा. शिवाजीराव अढळराव पाटील, खा. रामदास आठवले, खा. महाडिक आदींनीही पाठींबा दर्शविला.

Web Title: ... and LBT filling stop from April 1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.