...आणि गोदाघाटावर जमली गर्दी
By Admin | Updated: May 31, 2014 00:19 IST2014-05-31T00:14:58+5:302014-05-31T00:19:09+5:30
पंचवटी : गाडगे महाराज पुलाखाली दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे असे मेसेज भ्रमणध्वनी व व्हॉटस ॲपवर आले आणि युवकांनी लागलीच गाडगे महाराज पुलाकडे जाण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यातच पोलीसांनी अडविले त्यातच वाहतुकीची कोंडी त्यामुळे निश्चितच गोदाघाटावर कोणत्यातरी चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे हे बघण्यासाठी शेकडो युवकांनी गोदाघाटावर धाव घेतली.

दबंग ३ चे चित्रीकरण बघण्याच्या इराद्याने युवक गोदाघाटावर आले मात्र तेथिल दृश्य बघून हे चित्रपटाचे चित्रीकरण की काही घटना घडली हे समजेनासे झाल्याने अनेकांनी गोदाघाटावर तळ ठोकला. शेकडो पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाच्या गाडया, रुग्णवाहिका, शेकडो नागरीकांचा जमाव बघून सुरूवातीला काय झाले हे कोणालाच समजेना मग त्यातच काही युवकांनी थेट पोलीसांना विचारले दादा कोणत्या पिकचरचे शुटींग चालू आहे दादा भडकले अरे हा काय तमाशा नाही आणि शुटींगही नाही हे पोलीसांचे मॉक ड्रिल चालू आहे. काही घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापनाने काय दक्षता घ्यायची याचे प्रात्यक्षिक चालू असल्याचे सांगताच त्या तरूणांनी आले त्यादिशेने काढता पाय घेतला.
गोदाघाटावर मॉक ड्रिल चालू असल्याने अनेकांनी मित्रांना भ्रमणध्वीनवर पिकचरचे शुटींग चालू असल्याचे मेसेज पाठविले त्यामुळे चित्रपटातील हिरो हिरोइनला बघण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मात्र प्रत्यक्षात गोदाघाटावर चित्रपटाचे चित्रीकरण नव्हे तर मॉक ड्रिल सुरू असल्याचे कळताच अनेकांनी घरचा रस्ता धरला. (वार्ताहर)