...अन् रात्रीतून शेततळे करण्याचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: July 18, 2014 00:35 IST2014-07-17T22:38:55+5:302014-07-18T00:35:58+5:30

...अन् रात्रीतून शेततळे करण्याचा प्रयत्न फसला

... And the attempt to farmland overnight is in vain | ...अन् रात्रीतून शेततळे करण्याचा प्रयत्न फसला

...अन् रात्रीतून शेततळे करण्याचा प्रयत्न फसला

मालेगाव : तालुक्यातील दहिदी येथे हरियाली पाणलोट विकास योजनेअंतर्गत शेततळे न करता तीन शेतकऱ्यांची रक्कम ग्रामसेवकाने हडप केल्याचा प्रकार पंचायत समिती सभापती वंदना पवार यांनी उघडकीस आणला. त्यानंतर रात्रीतून ग्रामसेवकाने शेततळे तयार करण्याचा प्रयत्न जागरूक कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
दुपारी पंचायत समिती सभापतींनी ज्या जागेची पाहणी केली त्याच जागेवर रात्री दोन ठिकाणी दोन यंत्रांच्या साहाय्याने ते काम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हरियाली योजनेत दहिदी गावाची निवड झाली असून, १३ शेततळे मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी नऊ हजार ८०० रुपये लोकवर्गणी भरावयाची होती, तर शासनाचे ९० हजार ते एक लाख रुपये अनुदान होते. देवीदास भामरे यांना जून २०१३ मध्ये शेततळे मंजूर झाले. त्यासाठी त्यांनी रक्कमही भरली. ग्रामसेवक एम.डी. कुमावत यांनी त्यांना शेततळे निधी देण्यासाठी टाळाटाळ केली. मंजूर असलेला निधी भामरे यांना मिळाला नसल्याने त्यांनी पं.स. सभापतींकडे तक्रार केली. पं.स. सभापतींनी विस्तार अधिकारी डी.एम. जगताप, शांतीलाल पवार, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वाघ यांच्या मदतीने शेततळ्याची पाहणी केली असता तेथे शेततळेच झालेले नसल्याने निदर्शनास आले. यावेळी आमदार दादा भुसे यांच्यासह तालुका संघटक सुनील देवरे, नगरसेवक तानाजी देशमुख, चंद्रशेखर हिरे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वाघ, सोपान वाघ, मधुकर कचवे, शिवाजी कचवे, संजय माळी, दिलीप वाघ, मन्साराम भामरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: ... And the attempt to farmland overnight is in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.