नांदगावचे प्राचीन पिनाकेश्वर शिवमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:35+5:302021-08-15T04:16:35+5:30
महादेव येथे तपश्चर्या करत असतांना भिल्लिणीच्या रूपात येऊन पार्वतीने त्यांची सेवा केली. तिची तहान भागविण्यासाठी महादेवांनी पिनाक धनुष्याचा वापर ...

नांदगावचे प्राचीन पिनाकेश्वर शिवमंदिर
महादेव येथे तपश्चर्या करत असतांना भिल्लिणीच्या रूपात येऊन पार्वतीने त्यांची सेवा केली. तिची तहान भागविण्यासाठी महादेवांनी पिनाक धनुष्याचा वापर करून पिण्याच्या पाण्याचे कुंड तयार केले. म्हणून या मंदिराला पिनाकेश्वर नाव पडले अशी आख्यायिका आहे. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी यात्रा भरते. यावेळी शंकराचा पितळी मुखवटा पिंडीवर ठेवण्यात येतो. भाविक पाच दिवसांचे दंडवत व्रत करतात. यावेळी ते उघड्या अंगाने व अनवाणी पायाने वावरतात. पाच दिवस मुस्लिम समाजासह सर्व नागरिक मांसाहार वर्ज्य करतात.
प्रथेनुसार मुखवट्यास पंचस्नान घालून सनई, ढोलताशाच्या गजरात पिनाकेश्वर महादेवाचा जयघोष करीत, समाधिस्थ स्वामी सुकृदास महाराजांच्या पादुकांचे पूजन करून यात्रेचे निमंत्रण देतात. सन १९६२ मध्ये संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी लोकवर्गणी व श्रमदानातून हेमाडपंती पध्दतीचे बांधकाम करून जीर्णोद्धार केला. त्यानंतर श्री गंगागिरीजी महाराज यांनी सभामंडप,भक्तनिवास, भंडारगृह, व तटरक्षक भिंतीचे बांधकाम केले. श्रावण महिन्यात खान्देश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील भाविक हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. तिसऱ्या सोमवारी कायगाव टोका, कोपरगाव, गंगापूर तालुक्यातील सरलाबेट, वेरुळ येथील नद्यांचे पाणी बेल व भोपळ्याच्या फळात भरुन साठ ते नव्वद कि.मी. अनवाणी पायाने घेऊन येतात.
जाती जमाती व विविध धर्म या सर्वांना पूजाविधी व विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होण्याचा मान मिळत असल्याने हे सर्वधर्म समभाव जपणारे मंदिर बनले आहे.
(११ पिनाकेश्वर मंदिर, १)
110821\250811nsk_41_11082021_13.jpg
पिनाकेश्वर महादेव मंदिर.