चांदवडचे प्राचीन चंद्रेश्वर मंदिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:30+5:302021-08-15T04:16:30+5:30

चांदवड हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या व रेणुका देवीच्या आशीर्वादाने पावन झालेले ...

Ancient Chandreshwar temple of Chandwad! | चांदवडचे प्राचीन चंद्रेश्वर मंदिर !

चांदवडचे प्राचीन चंद्रेश्वर मंदिर !

चांदवड हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या व रेणुका देवीच्या आशीर्वादाने पावन झालेले ऐतिहासिक शहर आहे. या शहरात डोंगरावर पुरातन चंद्रेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. तर गावातही कार्तिकेश्वर मंदिर, शिंपाट गल्लीतील महादेव मंदिर, डोंगरावरील रासलिंग आदि शिवमंदिरे आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दुसरे वर्ष असल्याने यात्रा नाही की, श्रावण महिन्यात भाविक नाहीत, असे चित्र सध्या आहे.

चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रारोड लगत डोंगरावर एक चंद्रेश्वर मंदिर आहे. हे मंदिर दगडी स्वरूपातील प्राचीन असून, मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या मंदिरात महाशिवरात्रीला यात्रा उत्सव होतो.

दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. याचा हजारो भाविक लाभ घेतात. चांदवड परिसरात नव्हे तर महाराष्ट्रातील या दैवतांचे अनेक भाविक आहे. आजही दरवर्षी श्रावण महिन्यात चंद्रेश्वर येथे दररोज भाविक दर्शनास जातात. येथील चंद्रेश्वर भक्त मंडळाने अनेक सुधारणा कामी कै. स्वामी विद्यानंद महाराज व स्वामी दयालपुरी महाराज, सध्याचे स्वामी जयदेवपुरी महाराज यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रेश्वरचे प्रथम स्वामी दयानंद महाराज येथे आले. त्यांना या जागेचा दृष्टांत झाला होता. आज या ठिकाणी महादेवाचे शिवलिंग आहे. तो भाग पूर्णत: शेणामातीने भरलेला होता. बाबांनी हा भाग स्वच्छ करून येथील मंदिराची पुनर्रचना केली. अनंत अडचणींतून चंद्रेश्वर मंदिर नावारूपाला आणले.

आजही स्वामी दयानंद महाराज समाधी व सप्तशृंगी देवीचे मंदिर मुख्य चंद्रेश्वर मंदिरासमोर आहे. हे मंदिर साधारणत: १६ व्या शतकातील असावे, असा येथील शिलालेखावरून बोध होतो.

मंदिरात जाण्यासाठी क्वचितच काही पायऱ्या तर काही ठिकाणी अवघड वाट होती. मंदिरापर्यंत जाण्यासाठी चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून येथे पायऱ्या तयार करून घेतल्या.

चंद्रेश्वर मंदिर कोरीव असून, मंदिरावर अनेक वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पूर्वीचा जुना नगारादेखील आहे. गाभाऱ्यासमोर भगवान शंकराचे वाहन नंदी आहे. मंदिर परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. दर सोमवार, श्रवण महिनाभर तसेच महाशिवरात्र, हरिहर भेट, कोजागिरी पौर्णिमा, चंद्रेश्वर महाराज यांची पुण्यतिथी होत असते, तसेच महाशिवरात्र व पुण्यतिथीच्या दिवशी गडावरून पालखी गावात मिरवली जाते.

श्रवण महिनाभर दररोज एक लक्ष बिल्वपत्रे शिवलिंगावर वाहिली जातात. बाहेर गावाहून पाण्याच्या कावडी घेऊन भक्त येतात. चंद्रेश्वर मंदिरातील कार्यकर्ते दरवर्षी महिनाभर येथे महापूजा करतात. (१२ चंद्रेश्वर) प्राचीन चंद्रेश्वर मंदिर.

120821\195812nsk_33_12082021_13.jpg

 प्राचीन चंद्रेश्वर मंदिर.

Web Title: Ancient Chandreshwar temple of Chandwad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.