दीडशे एकर कोबीवर नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST2017-09-21T23:49:35+5:302017-09-22T00:17:42+5:30
सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली.

दीडशे एकर कोबीवर नांगर
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली. ‘दैव देते अन् कर्म नेते’ अशी नैसर्गिक आपत्ती बळीराजावर ओढवल्यामुळे नायगाव परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात लोटला गेला आहे. संपूर्ण नायगाव खोºयात सुमारे १३ कोटी रुपयांच्यावर शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने होरपळून आर्थिक बोजाखाली सापडला जाणारा शेतकरी यावर्षी कोबी व टमाटे ही पिके अस्मानी (नैसर्गिक) संकटामुळे काढणीला आलेले असताना शेतातच खराब (सडले) झाल्यामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांच्या सुमारे दीडशे एकर कोबी पिकाचे म्हणजे सुमारे दोन हजार २०० टन कोबीचे नुकसान झाले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, वडझिरे, देशवंडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी व टमाट्याचे पीक घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकºयांनी हे पीक घेतले होते. महागडे बी, खते, औषधे व मजुरीचा एकूण ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च करुन हे पीक घेतले होते; मात्र काढणीला काही दिवस शिल्लक असताना या पिकांवर करपा, दांड्या, काळ्या टिपक्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन दहा-पंधरा दिवसांत हे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने बाजारात विक्री अयोग्य झाले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून कोबीला अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मालाची प्रतवारी पाहून ७ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी शेतात खरेदी करत आहे. सध्याच्या सरासरी बाजारभावाप्रमाणे सुमारे बारा ते तेरा कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे पीक विक्रीसाठी आले असते तर या पिकाचे बºयापैकी पैसे बळीराजाच्या पदरात पडले असते. मात्र, अगदी हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास निसर्गाने अक्षरश: हिसकावून घेतल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कष्टकरी शेतकरी राजा निसर्गाच्या या अवकृपेमुळे आर्थिक बोजाखाली पुन्हा एखादा दबला गेला आहे, असे म्हटले तरी वावगे ठारणार नाही.