जिल्हा परिषदेत पेढे वाटून आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:10+5:302021-09-10T04:21:10+5:30
पालकमंत्री छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याच्या वृत्ताचे जिल्हा परिषदेत स्वागत करण्यात आले. कृषी सभापती संजय बनकर यांच्या ...

जिल्हा परिषदेत पेढे वाटून आनंदोत्सव
पालकमंत्री छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याच्या वृत्ताचे जिल्हा परिषदेत स्वागत करण्यात आले. कृषी सभापती संजय बनकर यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात सर्वच कर्मचाऱ्यांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सदस्य सिद्धार्थ वनारसे, दीपक शिरसाठ, उदय जाधव, जी. पी. खैरनार, कृष्णा पारखे, कृष्णकांत खोंड, नाना पवार, सचिन पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई नाका येथील कार्यालयासमोरही फटाके वाजवून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, पुरुषोत्तम कडलग, गणेश गायधनी, प्रफुल्ल पवार, संदीप भेरे, महेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.