वृद्ध चेहऱ्यांवर आनंदलकेर
By Admin | Updated: November 14, 2015 22:17 IST2015-11-14T22:16:35+5:302015-11-14T22:17:08+5:30
वृद्ध चेहऱ्यांवर आनंदलकेर

वृद्ध चेहऱ्यांवर आनंदलकेर
पंचवटी : बाजे मुरलीया, प्यार करे सब साई से, ये तो सच है की भगवान हे, फुलो का तारोंका सबका कहना है या आणि अशा विविध गाण्यांनी तपोवन येथील शेठ डुंगसी नागजी चॅरिटेबल ट्रस्ट वृद्धाश्रमात दीपावलीनिमित्त पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कमलेश शिंदे यांच्या संकल्पनेतून वृद्धाश्रमात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातील विविध हिंदी-मराठी गीतांच्या सादरीकरणाने आश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बघायला मिळाला. प्रशांत महाले, फारूक पिरजादे, सावन बोर्डे, डॅनिअल म्हस्के, नीलेश सोनवणे आदि कलावंतांनी या कार्यक्रमात साथ संगत केली. सूत्रसंचालन सोनाली म्हरसाळे यांनी केले.
यावेळी नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश गायकवाड, गोकुळ पाटील यांच्यासह आश्रमातील वयोवृद्ध उपस्थित होते. (प्रतिनिधी)