दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यानिमित्त आनंद नगरी
By Admin | Updated: January 31, 2017 01:17 IST2017-01-31T01:17:21+5:302017-01-31T01:17:33+5:30
दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यानिमित्त आनंद नगरी

दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यानिमित्त आनंद नगरी
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २१व्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिक्षण सहाय्यक मंडळाच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंद नगरीचा उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी सकाळी लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सुवर्णा जगताप, सुनंदा दरेकर, अनिता गंधे, रेखा भावसार, पुष्पाताई दरेकर, सरोज काळे, रंजना पाटील, निता पाटील, ब्रह्मेचा, काजी, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक लता जाधव, पर्यवेक्षक कुसुम चौधरी आदि उपस्थित होते. लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, शंतनु पाटील यांनी या उपक्र माचे संयोजन केले. लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच परिसरातील महिला पुरुषांनी आनंदनगरीचा आनंद लुटला. लासलगाव येथील गृहिणींनी घरी तयार केलेल्या पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. साडी खरेदी-विक्र ीला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, जिजामाता प्राथमिक शाळा या सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकांनी दिवसभर मेळाव्याचा आनंद लुटला. मेळावा यशस्वीतेसाठी प्राचार्य गायकवाड व गोसावी, मुख्याध्यापक लता जाधव, कुसुम चौधरी, अनिस काजी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)