संघाचा स्वयंसेवक राष्ट्रपती झाल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:50 IST2017-07-21T00:48:34+5:302017-07-21T00:50:16+5:30

समाधान : कोविंद यांना नाशिकमध्ये निमंत्रित करणार

Anand has become the volunteer of the RSS | संघाचा स्वयंसेवक राष्ट्रपती झाल्याचा आनंद

संघाचा स्वयंसेवक राष्ट्रपती झाल्याचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशाचे पंधरावे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर नाशिकमध्ये संघ कार्यकर्त्यांना विशेष आनंद झाला आहे. संघाचा सामान्य स्वयंसेवक राष्ट्रपती झाल्याचा आनंद असल्याच्या भावना ज्येष्ठ स्वयंसेवकांनी व्यक्त केल्या, तर आजवर नाशिकशी संबंध नसला तरी कोविंद यांना राष्ट्रपती म्हणून नाशिकमध्ये निमंत्रित करण्याचा मानसही ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ मोगल यांनी व्यक्त केला.
रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. संघ देईल तो आदेश मान्य करीत त्यांनी आजवर काम केले आहे. स्वयंसेवक म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कामं केले असले तरी नाशिकशी तसा त्यांचा कोणताही संबंध आला नाही. किंबहूना त्यांच्याबरोबर कामाची संधी नाशिककर स्वयंसेवकांना मिळाली नाही. तथापि, संघाची खडतर वाटचाल आणि त्यातून संघाचा एक स्वयंसेवक म्हणून कामकाज करणारा कार्यकर्ता देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दरम्यान, भाजपाच्या वतीनेदेखील कोविंद यांच्या निवडीबद्दल आनंदोत्सव व्यक्त केला. अर्थात, मुख्यालयात म्हणजेच भाजपाच्या मुख्यालयाजवळ जल्लोष न करता मंडल स्तरावर पेढे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Anand has become the volunteer of the RSS