आदिवासींमध्ये फुलवला आनंद
By Admin | Updated: November 9, 2015 23:49 IST2015-11-09T23:48:58+5:302015-11-09T23:49:46+5:30
आदिवासींमध्ये फुलवला आनंद

आदिवासींमध्ये फुलवला आनंद
नाशिक : नाशिक युथ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी दुर्गम आदिवासी भागात विविध साहित्यांचे वाटप आणि फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
शहरातील अनेक कलाकार, व्यावसायिक, विविध संस्था आणि सर्वसामान्य कुटुंबांनी या उपक्रमास कपडे, फटाके आणि अन्य साहित्य देऊन मदत केली आणि त्यानंतर हा उपक्र म सर्वांच्या मदतीने उत्साहात पार पडला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बुवाचीवाडी आणि अंबाई येथील आदिवासी कुटुंबाना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. गावातील शाळकरी मुलांना खाऊ वाटप केल्यानंतर त्यांच्यातील विविध कलागुणांचे सादरीकरण मुलांनी केले. आदिवासी भागातील गाणे, तसे भोंदूगिरी व बुवाबाजीवर नाटकही या गावातील शाळकरी मुलांनी सादर केले. तसेच अंबाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या पाण्याचे जार आणि शैक्षणिक साहित्य मुख्याध्यापक प्रतिभा सोनजे यांच्याकडे देण्यात आले. त्यासाठी स्वप्नील येवले, सुनील मुसळे व अनिल सरोदे यांनी सहकार्य केले. लवकरच संस्थेच्या वतीने बुवाचीवाडी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली जाणार आहे.
कार्यक्रमास संदीप सिनकर, नितीन टिळे , विक्र ांत पाटील, अभिजित खरोटे, संदीप सरोदे, आकाश गायकवाड, विवेक संत, डॉ. सुजित कुदळे, डॉ. करण पाटोळे, नितीन पवार, चारू सूर्यवंशी, मयूरी शिरोडे, पाटोळे, उन्नती विद्यालयाचे धांडे, नेर, पांडुरंग येवला, ओमकार शिखरे, मनोज वेंगुर्लेकर, नारायण सोनजे, भास्कर मेढे,
राजेश दरगोडे, पंकज शिरोडे, अविनाश तकाटे, अनुप शिरु डे, सहदेव
कोठावदे यांच्यासह माउली प्रतिष्ठानचेही पदाधिकारी उपस्थित होते.