अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:16 PM2019-01-15T18:16:04+5:302019-01-15T18:16:59+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे.

anaavasayaka-maanapaana-anaathaayai-kharacaalaa-phaataa | अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !

अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !

googlenewsNext
ठळक मुद्देतळवाडे ग्रामसभा : ठरावाविरु ध्द प्रयत्न केल्यास २१ हजार रु पये दंडाची शिक्षा

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे.
तळवाडे येथे लग्नाची मिरवणुक वरात लग्नात फेटे,दारु अशा कोणत्याही फालतु अशा अनावश्यक खर्चालाच बंदी करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह गावातील प्रमुख व युवा कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
कोणत्याही धार्मिक कार्यात शाल, टोपी घेण्या-देण्यास बंदीचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव न पाळल्यास २१ हजार रु पये दंडाची शिक्षा निश्चित करण्यात आली.
तळवाडे गावात आता नवरदेवाची मिरवणूक निघणार नाही की, डिजे सारखे जास्त आवाजाचे वाद्यही वाजणार नाही. विवाहासाठी आलेल्या वºहाडी मंडळींना फेटे बांधले जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर संध्याकाळच्या वरातीसह हळदीला जाताना नवरदेवाची मिरवणूक देखील निघणार नाही. असा अभूतपूर्व निर्णय तळवाडे ग्रामस्थांनी ‘गावविकास’ बैठकीमध्ये घेतला आहे. त्याचे उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केले आहे.
मंगळवारी ग्रामस्थांची ‘गावविकास’ सभा झाली. त्या हा ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर भिवसेन, उपसरपंच संतोष बोडके, चेअरमन मोहन बोडके, माजी सरपंच रोहिदास बोडके, बाळू बोडके, व्हा.चेअरमन समाधान आहेर, महीपत बोडके, शिवाजी कसबे, तानाजी बोडके, भास्कर बोडके, युवराज बोडके, ज्ञानेश्वर गांगुर्डे, निवृत्ती भिवसेन, मिहपत बोडके, केरु आहेर, शरद बोडके, गणपत आहेर, गंगाराम आहेर, वाळू बोडके, वामन बोडके, भाऊसाहेब गांगुर्डे, प्रकाश बोडके, संजय बोडके, शिवाजी बोडके पोलीस ठाण्याचे संजय खैरनार, आप्पा काकड, भाबड आदी उपस्थित होते.
एक गाव एक गणपतीचा ठराव...
गावात विविध ठिकाणी गणपती सोबत नवरात्री उत्सव, करण्यात येतो त्यामुळे यावर उपाय म्हणून तळवाडे येथे एक गाव एकच उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गावात फक्त यापुढे गणपती, नवरात्री उत्सव, शिव जयंती, आंबेडर जयंती यावेळीच फक्त एकच मिरवणुक काढण्यात येणार आल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. व तश्या आशयाचा ठराव पोलिस स्टेशनला देण्यात आला.
............
ग्रामीण भागात मानपाना मुळे सर्वसामान्य गरीब शेतकरी अडचणीत आलेले आहेत. अशावेळी सामाजिक भान जपत लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळायला हवा. दारुमुळे चांगल्या कार्यात नाहक वाद काढले जातात. त्यात डीजे असल्यावर तर दारु च्या नादात लग्नसमारंभ वेळेवर पार पडत नाहीत. ते वेळेवर पार पाडण्या साठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याने अनावश्यक खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने घेण्यात आला आहे.
संतोष बोडके,
उपसरपंच.
 

Web Title: anaavasayaka-maanapaana-anaathaayai-kharacaalaa-phaataa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.