चव्हाण पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमृतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST2021-05-25T04:16:06+5:302021-05-25T04:16:06+5:30

पतसंस्थेच्या सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक रवींद्र देवरे ,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष परशुराम पगार,आदर्श शिक्षक के. के. शिंदे, माजी सरपंच अरविंद ...

Amritkar as the Chairman of Chavan Credit Union | चव्हाण पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमृतकर

चव्हाण पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमृतकर

पतसंस्थेच्या सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक रवींद्र देवरे ,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष परशुराम पगार,आदर्श शिक्षक के. के. शिंदे, माजी सरपंच अरविंद कोठावदे यांच्या प्रमुख उपस्थित सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक गायकवाड यांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी दीपक अमृतकर, व्हाईस चेअरमन पदासाठी विजय वालखडे, जनसंपर्क संचालक पदासाठी विष्णू महाजन यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन धिरेन पगार यांनी आणून नितीन कोठावदे यांनी अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली.

यावेळी डॉ.पी.एच.कोठावदे, प्रिया संचेती, राजेंद्र पवार , जितेंद्र विसपुते ,संजय पवार, बुधा जाधव, नितीन कोठावदे, धिरेन पगार, फकिरा वाडेकर, अनिता महाजन, पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय येवले व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Web Title: Amritkar as the Chairman of Chavan Credit Union