आम्रपाली पगारे ठरली ‘सूर सुपरस्टार’ची उपविजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:16 IST2020-01-13T22:44:56+5:302020-01-14T01:16:24+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.

Amrapali salaries run by 'Sur Superstar' | आम्रपाली पगारे ठरली ‘सूर सुपरस्टार’ची उपविजेती

आम्रपाली पगारे ठरली ‘सूर सुपरस्टार’ची उपविजेती

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.
सारेगमप लिटिल चाम्पचे म्युझिक अ‍ॅरेंजर संगीतकार अनुप शंकर यांच्या हस्ते आम्रपालीचा गौरव करण्यात आला. आम्रपालीस तिचे काका संगीतकार अनिल पगारे, वडील गौतम पगारे, शिक्षक शंकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
आम्रपालीचे येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, माजी सभापती संभाजी पवार, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड, केंद्र प्रमुख विमल शिंदे, स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, प्रसाद, नाट्य कलावंत शंकर अहिरे, मुख्याध्यापक राजेंद्र कुशारे, भारत कानडे, संदीप निकम, केदू केदारे आदींनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Amrapali salaries run by 'Sur Superstar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.