अमित शाह यांनी केले गंगेचे पूजन
By Admin | Updated: August 19, 2015 23:50 IST2015-08-19T23:49:49+5:302015-08-19T23:50:29+5:30
ध्वजारोहणानंतर दिली रामकुंडाला भेट

अमित शाह यांनी केले गंगेचे पूजन
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने साधुग्राम येथे ध्वजारोहण सोहळ्याला येण्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, त्यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांनी रामकुंडावर सकाळी भेट देऊन कुटुंबीयांसमवेत गंगा गोदावरीचे पूजन करून विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली.
साधुग्राम येथे होणाऱ्या सोहळ्याला हजेरी लावण्यापूर्वी शहा यांनी सकाळी साडेसहा वाजता रामकुंडावर जाऊन मार्जन स्नान केले त्यानंतर गंगा गोदावरीचे पूजन केले व दर बारा वर्षांनी उघडणाऱ्या गंगा गोदावरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. भारत सुजलाम् सुफलाम् होवो, देशात हरितक्रांती घडावी यासाठी त्यांनी संकल्प केला. त्यानंतर रामकुंड येथे उभारलेल्या सिंहस्थ ध्वजाचे पूजन केले. यावेळी शहा यांच्या पत्नी, मुलगा तसेच सून आदिंसह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप आदिंसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल, अलोक गायधनी, अमित गायधनी, चंद्रशेखर पंचाक्षरी आदिंनी पौरोहित्य केले. (वार्ताहर)