मक्यावर अमेरिकन अळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:21 PM2020-06-25T21:21:28+5:302020-06-25T21:25:11+5:30

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका पिकावर सध्या अमेरिकन अळीचे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

American larvae on maize | मक्यावर अमेरिकन अळीचे थैमान

मक्यावर अमेरिकन अळीचे थैमान

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांसमोर नवे संकट : औषध फवारणीसाठी धावपळ; घास हिरावला जाण्याची भीती

गोरख घुसळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका पिकावर सध्या अमेरिकन अळीचे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीसाठी शेतकरीवर्गाची धावपळ सुरू आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. यावर फवारणी करण्यासाठी आर्थिक खर्च करावा लागत आहे. तालुक्यात यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व हजेरी लावल्याने शेतकरीवर्गाने शेती मशागतीची कामे पूर्ण करीत जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसावर मका पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली.कृषी विभागातर्फे शेतकºयांना मार्गदर्शनउगवण झालेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले असून, विविध उपाययोजना, औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. ताटात वाढलेला घास हिरावला जातो की काय, अशी चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करावी याबाबत येवला तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करीत आहेत.

मका लागवडीनंतर आठच दिवसात पीक पिवळे पडू लागले. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीने थैमान घातले आहे. अळी नियंत्रणासाठी सुमारे आठ हजार रुपये खर्च करून दोन वेळेस औषध फवारणी केली मात्र अळी नियंत्रणात येत नाही.
- संजय भवर, ठाणगाव

उत्पन्न तसेच जनावरांना चारा उपलब्ध होईल म्हणून शेतात मका पिकाची लागवड केली; मात्र पिकाच्या पोंग्याला लष्करी अळीने वेढले आहे. औषधांच्या महागड्या फवारण्या करूनही नियंत्रण येत नाही. शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी या अळीग्रस्त मका पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी
-ज्ञानदेव शेळके, ठाणगाव

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. येवला कृषी विभागाच्या वतीने लष्करी अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरीवर्गाला मार्गदर्शन केले जात आहे.
- प्रकाश जवने, कृषी सहाय्यक, पाटोदा मंडळ

Web Title: American larvae on maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.