वाहनतळाबाबत अमेरिकन संस्थेचे प्रात्यक्षिक
By Admin | Updated: December 20, 2014 00:38 IST2014-12-20T00:28:54+5:302014-12-20T00:38:08+5:30
वाहनतळाबाबत अमेरिकन संस्थेचे प्रात्यक्षिक

वाहनतळाबाबत अमेरिकन संस्थेचे प्रात्यक्षिक
नाशिक : शहरातील वाहनतळांची समस्या सोडविण्यासाठी युनायटेड ट्रॅफिक अॅण्ड पार्किंग असोसिएशनने महापालिकेपुढे एक अभिनव योजना सादर केली असून, त्याचे प्रात्यक्षिक शुक्रवारी आयुक्तांसह महापौर-उपमहापौरांना दाखविण्यात आले.
सदर संस्था शहरातील वाहनतळांचा सर्व्हे करेल. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक वाहनतळांची योजना साकारली जाईल. या योजनेनुसार वाहनतळावर किती वाहने आहेत, वाहनधारकांकडून योग्य शुल्क आकारले जाते की नाही, कोणत्या क्रमांकाचे वाहन कोठे उभे आहे आदि माहिती एका कक्षात उपलब्ध होणार आहे.(प्रतिनिधी)