शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:25 IST

नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणाºया ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखांचे बक्षीस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देअमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये चांदवड, सिन्नरची निवडराज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा

नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणाºया ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखांचे बक्षीस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून पानी फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृश्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाउंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाची अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्णात कायमच टंचाईला सामोरे जावे लागणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाºया ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाणी फाउंडेशनला सादर करावा लागणार आहे. सहभागी होणाºया ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावेही फाउंडेशनला कळवायची असून, फाउंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यात जवळपास ४५ ते ५० ठिकाणी फाउंडेशन प्रशिक्षण सेंटर सुरू करणार आहे. या शिबिरात सहभागी होणाºया शिबिरार्थींचा प्रवास, राहण्याची, खाण्याची व निवासाची सोय फाउंडेशन करणार असून, शिबिरार्थींना कामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.येत्या ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाºया ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे करायची आहेत. या कामांसाठी मात्र फाउण्डेशन कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. त्यासाठी लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करावी लागणार असून, पानी फाउण्डेशन या स्पर्धेचा निकाल घोषित करेल. राज्यात पहिल्या येणाºया तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तालुक्यात पहिल्या येणाºया ग्रामपंचायतीला १० लाख बक्षीस देण्यात येईल.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी