मित्रमेळा सामाजिक संघटनेतर्फे रुग्णवाहिका
By Admin | Updated: December 6, 2015 22:38 IST2015-12-06T22:37:21+5:302015-12-06T22:38:14+5:30
मित्रमेळा सामाजिक संघटनेतर्फे रुग्णवाहिका

मित्रमेळा सामाजिक संघटनेतर्फे रुग्णवाहिका
नाशिकरोड : मित्रमेळा सामाजिक संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने हे एक चांगले उपक्रम असून, रुग्ण सेवा हीच खरी सेवा आहे. याचा आदर्श इतर संघटनांनी घ्यावा, असे आवाहन माजी आमदार वसंत गिते यांनी केले.
सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मित्रमेळा सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिकरोड येथील वीर सावरकर उड्डाणपुलाखालील नवले चाळ परिसरात दिंडोरी व इतर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी श्रमदानातून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नाशिकरोड मनपा प्रभाग सभापती केशव पोरजे, मनसेचे गटनेते अशोक सातभाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तानाजी गायधनी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजणे, राजू मोरे, मनसेचे साहेबराव खर्जुल, योगेश भोर, रिपाइंचे सुनील कांबळे, शेखर भालेराव, आकाश भालेराव, संजय गायकवाड, किशोर चव्हाण, नवनाथ ढगे, नलीन ठाकूर, विक्रम कोठुळे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, शहराध्यक्ष दौलत शिंदे, दीपक नाईकवाडे, नयूम खान, रमेश पाळदे, संतोष पिठे, सनी सारसाल, अरुण सातभाई, नाना टिळे, सागर पाटील, शिवाजी उगले, पप्पू निकम, सचिन शिंगारे, बंटी विभांडिक, परेश कदम, सचिन सूर्यवंशी, गुड्डू शेख, आरिफ शेख आदि प्रयत्नशील होते. (प्रतिनिधी)