रूग्णवाहिका चालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST2021-05-25T04:16:15+5:302021-05-25T04:16:15+5:30

नाशिकरोड : कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांसाठी अहोरात्र रुग्णवाहिका सेवा देऊन कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या ...

Ambulance driver felicitated | रूग्णवाहिका चालकांचा सत्कार

रूग्णवाहिका चालकांचा सत्कार

नाशिकरोड : कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांसाठी अहोरात्र रुग्णवाहिका सेवा देऊन कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या २६ चालकांचा नाशिकरोड येथील धोंगडे नगर मित्रमंडळाच्यावतीने बिटको कोविड रुग्णालय आवारात सत्कार करण्यात आला. धोंगडे नगर मित्रमंडळाच्यावतीने शीतल धोंगडे व पूजा आडके यांनी रुग्णवाहिका चालकांचे औक्षण केले. माजी आमदार योगेश घोलप, मंडळाचे अध्यक्ष अतुल धोंगडे, राजेश फोकणे, योगेश भोर, नितीन चिडे, प्रशांत भालेराव यांच्या हस्ते रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नयन धोंगडे, सुनील सोनवणे, गणेश बनकर, कैलास मालुंजकर, पप्पू जगताप, सचिन कोठुळे, वैभव पाळदे, शेखर बनकर, समाधान सहाणे, लकी ढोकणे, अतुल चव्हाण, विशाल पाटील, आदित्य धोंगडे, मयुरेश भालेराव, प्रणय खुडे, हर्षद जोशी, अमन रोकडे, दिलीप जमधडे, आदी उपस्थित होते.

(फोटो २४ रूग्ण)

Web Title: Ambulance driver felicitated