शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पावसाचे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 20:29 IST

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : दिंडोरी तालुक्यातील प्रकल्प; बारा वळण योजनांची पाहणी

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प बारा वळण योजना यांची पाहणी तसेच देहरे येथे ल.पा. योजनेच्या कामाचा शुभारंभ, अंबाड येथील ल.पा. योजनेचे जलपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. देहरे येथील ल. पा. योेजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी धोंडाळपाडा ग्रामस्थांशी संवाद साधला.जयंत पाटील यांनी दिंडोेरी, पेठ तालुक्यात देवसाने मांजरपाडासह विविध वळण योजना लघुपाटबंधारे आदी सिंंचन प्रकल्प राबवल्याबद्दल कौतुक करत हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू, आवश्यक त्या नवीन योजनांचा सर्व्हे करत त्या योजनाही मार्गी लावू, असे आश्वासन जयंंत पाटील यांनी दिले. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील पश्‍चिम घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील. पश्‍चिमेला वाहून जाणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यासाठीच वळण योजनांचा वापर पाणी अडवण्यासाठी करता येईल. या पाण्याचे आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. या परिसरातील वळण योजनांच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीवरून छोटे छोटे केटिवेअर, पाझर तलाव बांधून स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याला कटिबद्ध आहे, असेही पाटील म्हणाले.वळण योजनांसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, परंतु स्थानिकांना पाणी आरक्षण मिळत नाही. अनेक ठिकाणी पाणीवापर संस्था स्थापन केल्या आहेत; परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. मांजरपाडा प्रकल्पातही स्थानिक जनतेला पाणी आरक्षण मिळालेले नाही, ते देण्यात यावे आदी मागण्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्या. यावेळी कादवा चेअरमन श्रीराम शेटे यांनीही तालुक्यातील सिंचन समस्या पाटील यांच्याकडे मांडल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईGovernmentसरकार