शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत संदिग्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:51 IST

वणी - गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९५३ क्रमांकाच्या रस्त्याच्या कामाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, विविध कारणांनी प्रकाश झोतात असलेल्या महामार्गाची तुलना राज्य मार्गाबरोबर होत असल्याच्या नागरिकांच्या भावना असून केंद्रीय स्तरावर याची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : काम नियमित होत नसल्याच्या तक्रारी

गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यातील दळणवळण सुरक्षित व्हावे, वेळेचा अपव्यय टाळावा, अनावश्यक आर्थिक फटका बसू नये, तसेच दोन्ही राज्यातील उद्योगांना चालना मिळावी तसेच महाराष्ट्रात असलेल्या देवस्थान त्यात शिर्डी येथे गुजरात राज्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, या उद्देशाने ३ ऑगस्ट २०१६ साली केंद्र सरकारच्या सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांच्याकडून अधिसूचना जारी करण्यात आली. ९५३ सापुतारा, सराड, वणी, पिंपळगाव १०४ ते १२१ किलोमीटर अंतरासाठी रस्ता रुंदीकरण, दोन लेन व पेव्हड शोल्डर पूर्ततेसाठी सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. रस्त्याची अधिसुचनेनुसार रुंदी , साईड पट्ट्या, वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन सूचना व नियम वाहतुकीस अडथळा ठरू शकणारे विजेचे खांब, विद्युत वाहिन्या, निर्मित अडथळे याबाबत केंद्र शासनाच्या आदेशाचे पालन पूर्तता होण्याची गरज आहे. रस्त्याचे काम करत असताना काही ठिकाणी जेसीबीने किरकोळ स्वरूपात उकरुन त्यावर तयार करण्यात आलेला हा रस्ता टिकेल की नाही, याबाबत साशंकता असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व मानवी हक्क ग्लोबल इंडिया फाउंडेशन टिम आरटीआय महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप अवधुत यांनी दिली. या सर्व द्राविडी प्राणायामात कार्यकारी अभियंता यांनी वर्षानंतर नियमांचा फलक लावून कर्तव्य पूर्ण केले असून, रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांची नाराजी कायम असल्याची माहिती प्रमोद भांबेरे , अमोल भालेराव ,गोविंद थोरात यांनी दिली. केंद्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी या कामासाठी खर्च होत आहे. प्रतवारी, दर्जा, कामाचे स्वरूप व नियमांचे पालन याचा समन्वय साधण्यासाठी नियुक्त अधिकारी, जाणकार व सक्षम आहेत. दरम्यान, वणी पिंपळगाव रस्त्यावरील विद्युत पोल व विद्युत वाहिनी स्थलांतर करण्याचे नियोजनाबाबत गुजरात येथील ठेकेदार यांच्याशी संपर्क केला असता, गेल्या अनेक दिवसांपासून एका ठेकेदाराला या कामाचा ठेका दिल्याची माहिती दिली. विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मुळकर यांनीही यास दुजोरा दिला; मात्र याबाबत कोणतीही हालचाल अद्याप दिसून आलेली नाही.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्ग