आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:49+5:302020-12-08T04:11:49+5:30

इंदिरानगर : स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक उज्ज्वला माळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन ...

Ambedkar Mahaparinirvana Day | आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

इंदिरानगर : स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक उज्ज्वला माळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक अरुण जाधव, विनायक नवसुपे, यशश्री गायधनी, प्रिया शेवाळे, विजया ठाकरे आदी उपस्थित होते.

---------

नाशिकरोड : उपनगर येथील भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी आदरांजली वाहिली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. इंदुबेन वाघेला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रेरणा साबळे यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून साळवे व सुनील सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी सांस्कृतिक समितीप्रमुख मोनिका चौधरी, केशव ठोंबरे, प्रेरणा साबळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

-------

नाशिकरोड : बिटको महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय तुपे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून सामुदायिक बुद्धवंदना झाली. रोहिणी पाईकरावने गीत सादर केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. मंजूषा कुलकर्णी, डॉ. महेश औटी, ग्रंथपाल डॉ. आर. बी. बागुल, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, प्रा. सिद्धार्थ निंबाळकर, निलेश महाजन, अनिल सावळे, डॉ. अश्विनी घनबहादूर, प्रा. लक्ष्मण शेंडगे, प्रा. आजिनाथ नागरगोजे, संजय परमसागर, राजू वाघ, मनोहर गायकवाड, अरुण ताजनपुरे, अविनाश कांबळे उपस्थित होते.

-----------

Web Title: Ambedkar Mahaparinirvana Day