हल्ला करणारे संशयित अंबड पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST2021-07-29T04:15:33+5:302021-07-29T04:15:33+5:30

सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. मनसे पदाधिकारी देवचंद केदारे, दीपक पारधी, संतोष मंडलिक हे पाटीलनगर ते बडदेनगर रस्त्याने ...

Ambad police suspect in attack | हल्ला करणारे संशयित अंबड पोलिसांच्या ताब्यात

हल्ला करणारे संशयित अंबड पोलिसांच्या ताब्यात

सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. मनसे पदाधिकारी देवचंद केदारे, दीपक पारधी, संतोष मंडलिक हे पाटीलनगर ते बडदेनगर रस्त्याने परतत असताना दहा ते बारा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. यात मनसे पदाधिकारी केदारे यांनी तक्रार दिली होती. या घटनेला राजकीय वळण लागू नये म्हणून अंबड पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश शिंदे, किशोर कोल्हे यांनी पथक तयार केले. पथकातील कर्मचारी हेमंत आहेर, राकेश राऊत, चंद्रकांत गवळी, पंकज शेळके, अनिरुद्ध येवले यांनी विविध ठिकाणी लपून बसलेले संशयित आशीर्वाद डगळे, पवन वायाळ, ललित कदम, मॉन्टी दळवी, सनी बच्छाव, अक्षय गावंजे व शंतनू भोर यांना गजाआड केले. उर्वरित संशयित लवकरच गजाआड होतील, असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Ambad police suspect in attack