अंबड पोलीस : पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त

By Admin | Updated: July 24, 2014 01:03 IST2014-07-24T00:20:21+5:302014-07-24T01:03:01+5:30

घरफोडीच्या तीन टोळ्या पोलिसांकडून चतुर्भुज

Ambad Police: The seized cash of Rs | अंबड पोलीस : पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त

अंबड पोलीस : पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत झालेल्या घरफोड्यांमधील आरोपींना पकडण्याबरोबरच त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या टोळीबरोबरच दोन दुचाकी चोरट्यांनाही पकडण्यात आल्याची माहिती अंबड पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी़ जे़ बर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली़
अंबड पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बर्डेकर यांनी सांगितले की, अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यांपासून घरफ ोड्यांचे प्रमाण वाढले होते़ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या घरफ ोड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोपींचा शोध घेत होते़ अखेरीस अंबड पोलिसांना घरफोड्या करणाऱ्या तीन टोळ्यांना पकडण्यात यश आले़
या तीनही टोळ्यांमधील नऊ आरोपींकडून सहा गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे पावणेतीन लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे़
पोलिसांनी संशयित अरुण मारुती कांबळे ऊर्फ घाऱ्या (रा़ गोल्फ क्लब मैदान झोपडपट्टी), संतोष भोलाप्रसाद राजधर (रा़ श्रमिकनगर, सातपूर), राकेश रामदास खिरारी (रा़मारुती संकुल, अंबड), प्रशांत ऊर्फ लव्हली सतीश जिटेथोर (रा़दत्तनगर, अंबड), विनोद अण्णा कुमावत (रा़दत्त चौक), तानाजी विनायक गायकवाड (रा़इंदिरा गांधी वसाहत), धीरजकुमार कैलास राऊत (रा़दत्तनगर, अंबड), दिलीप पांडुरंग सकट (लक्ष्मीनगर, अंबड) अशा नऊ जणांना अटक केली आहे़
या संशयितांबरोबरच सुजीत कृष्णा मालाकार (रा. अंबड) व करण अण्णा कडुसकर (लक्ष्मीनगर, अंबड) या दोघा दुचाकी चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अजून काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (वार्ताहर)

Web Title: Ambad Police: The seized cash of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.