अंबडला विवाहितेवर बलात्कार

By Admin | Updated: April 22, 2017 00:56 IST2017-04-22T00:55:48+5:302017-04-22T00:56:07+5:30

नाशिक : पती-पत्नीतील भांडणाचा फायदा घेऊन देवराम जंगम व विष्णू झाकणे या दोघांनी विवाहितेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

Ambad married rape | अंबडला विवाहितेवर बलात्कार

अंबडला विवाहितेवर बलात्कार

 नाशिक : पती-पत्नीतील घरगुती भांडणाचा फायदा घेऊन चुंचाळे शिवारातील संशयित देवराम जंगम व विष्णू झाकणे (रा. दोघे चुंचाळे शिवार, अंबड) या दोघांनी विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे शिवारात राहणाऱ्या ३० वर्षीय महिला व तिच्या पतीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत असे़ या भांडणाचा फायदा घेत २०११ पासून ते २०१७ या कालावधीत संशयित जंगम व झाकणे या दोघा संशयितांनी महिलेवर जेलरोड तसेच चुंचाळे शिवारात बळजबरीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार या दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Ambad married rape