भक्तवत्सल बालाजी मंदिरामध्ये मुर्तीवर आम्र अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:00 IST2019-06-18T21:59:22+5:302019-06-18T22:00:02+5:30
लासलगांव : येथील भक्तवत्सल बालाजी मंदिरामध्ये भगवान बालाजी यांचा ज्येष्ठभिषेकम कार्यक्र म सोमवारी उत्साहात संपन्न झाला.

बालाजी भगवान यांचा आम्रअभिषेक करताना पुजारी कन्हैयालाल.
ठळक मुद्देउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
लासलगांव : येथील भक्तवत्सल बालाजी मंदिरामध्ये भगवान बालाजी यांचा ज्येष्ठभिषेकम कार्यक्र म सोमवारी उत्साहात संपन्न झाला.
येथील भक्त वत्सल्य श्री बालाजी मंदिरामध्ये भाविकांनी आणलेल्या आंब्यांचा आमरस तयार करून भगवान व्यंकटेश यांचा आम्ररसाने अभिषेक करण्यात आला.
यावेळी गोविंद सेवक आणि सेविकांच्या भक्ती भजनामध्ये सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. याच मुहूर्तावर गोविंद सेवक चिंगू तिवारी यांनी दान केलेल्या गायीचा देवस्थानातील गोमाता मंदिरात प्रवेशपूजन करण्यात आले. त्यानंतर गोविंद सेवक परिवारातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.