राष्ट्रवादीच्या विचारांशी कायम बांधील; माजी आमदार हिरेंचे स्पष्टीकरण
By श्याम बागुल | Updated: July 1, 2023 14:32 IST2023-07-01T14:31:44+5:302023-07-01T14:32:01+5:30
काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांच्या समवेत आपण ठाकरे गटाचे खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती.

राष्ट्रवादीच्या विचारांशी कायम बांधील; माजी आमदार हिरेंचे स्पष्टीकरण
नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाशी आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ, असून पक्षात कोणतीच अडचण नसल्याचे सांगत माजी आमदार डॉ. अपुर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चेला पुर्ण विराम दिला असून, यापुढेही पक्षाचेच काम करत राहणार असल्याचे जाहीर केले आहेे.
गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अपुर्व हिरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी खळबळ उडाली होती. हिरे हे गेल्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेवून पराभूत झाले आहेत. त्यामुळे यंदा त्यांची या मतदार संघात दावेदारी मानली जात असतांना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील बडगुजर यांची उमेदवार धोक्यात येण्याची शक्यताही निर्माण झालेली असतांना हिरे यांनी मात्र ठाकरे गटातील प्रवेशाचा साफ इन्कार केला आहे ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने मला उमेदवारी देवून विश्वास ठेवला. त्यामुळे या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांच्या समवेत आपण ठाकरे गटाचे खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत धुळे लोकसभा मतदार संघ, पश्चिम विधानसभा मतदार संघ व नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकी बाबत सकारात्मक चर्चा केली. यामुळे कदाचित शिवसेनेत (ठाकरे गट) मध्ये जाणार असल्याचा चर्चेना उधाण आले असावे असेही डॉ. हिरे यांनी सांगितले.