शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन आठवणींनी रंगला माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:36 IST

श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या ​महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत ​2003 ते 2017 या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विविध कायर्क्रमांनी रंगला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा  व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली.

ठळक मुद्देमहावीर फार्मसी महाविद्यालयात रंगाल माजी विद्यार्थी मेळावाविद्यार्थ्यांनी जागवल्या कॉलेज कट्यांवरच्या आठवणी आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण

नाशिक : श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या ​महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत ​2003 ते 2017 या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विविध कायर्क्रमांनी रंगला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा  व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिष संघवी उपस्थित होते. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी  व्यासपीठावर  ​महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य अजय देशपांडे , संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार , महावीर पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे ,डीन  डॉ. प्रियांका झंवर , चार्टर्ड अकौंटंट आनंद झंवर आदी उपस्थित होते. ज्ञान म्हणजे काय ?, ते कसे मिळवले जाते ?,मिळविलेल्या ज्ञानाचा जीवनात कसा वापर करावा ? याबद्दल अध्यक्ष हरिष संघवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, असा उपक्रमाचा उद्देश असल्याचे  श्री हरिष संघवी  यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांनी त्यासाठी योगदान देवून सहकार्य करावे  असे  प्राचार्य अजय देशपांडे म्हणाले. यावेळी मनोज मंडाले, गणेश खुर्द्ळ , भाग्यश्री जोशी या माजी विद्यार्थिनींनी तसेच माजी विद्यार्थी व सध्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. धनश्री बनकर , प्रा. वृषाली जगताप , यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी चेतन माळी , सायली चौधरी, सध्या कार्यरत प्रा. वृषाली देसाई व प्रा. धनश्री बनकर यांनी त्यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहुतांश विद्यार्थी नोकरी आणि व्यवसायासाठी  धुळे ,जळगाव, मुंबई पुणे अगदी परदेशातून म्हणजेच लंडनहूनही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांची भेट शिक्षक व त्यांच्या जुन्या मित्रांबरोबर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला. नवनवीन विषयावर चर्चा घडून यावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन आले होते. सूत्रसंचालन प्रा. अनघा सर्वज्ञ यांनी केले. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिकStudentविद्यार्थी