शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थी बनले रक्षणकर्ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:03 IST

ओझर बाजारपेठेतील अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने पत्रे टाकून मुख्य मार्ग बंद करत शाळेला संरक्षण दिल्याने चिमुकल्यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देओझर : गैरकृत्यांना आळा; जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला लावले संरक्षक पत्रे

ओझर : बाजारपेठेतील अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने पत्रे टाकून मुख्य मार्ग बंद करत शाळेला संरक्षण दिल्याने चिमुकल्यांनी समाधान व्यक्त केले.१४ मे रोजी शाळेबद्दलचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर येथील माजी विद्यार्थी बाळा बोस, अनिल राऊत, मंगेश राऊत, भूषण मोरे, माधव धुळे, दत्ता बोस, फज्जू शेख यांनी स्वखर्चाने पत्रे आणत मुख्य प्रवेशद्वार बंद करून शाळेच्या परिसरात पाळीपाळीने देखरेख करण्यासाठी पुढे सरसावले आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या ओझरच्या बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागलेले ग्रहण सुटत नसतानाच लॉकडाउनचा गैरफायदा अनेक टवाळखोर घेत होते. शालेय आवार मद्यपी, जुगारी आणि प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले होते. ओझर गावात दोन जिल्हा परिषद शाळा आहेत. महामार्गाच्या पलीकडे मुलांची तर बाजारपेठेत मुलींची. सध्या हायवेच्या शाळेचे निर्लेखन झाल्याने तेथील विद्यार्थी गावातच दोन सत्रांमध्ये कसेबसे शिक्षण घेतात. या शाळेच्या आवाराची खासियत म्हणजे चहूबाजूने आत शिरता येते. शाळा सुटली की इमारतीत सुरू होते ती मद्यपींची मेजवानी. यामुळे आवारात पडलेला बाटल्यांचा खच, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, मच्छरांचे साम्राज्य, कुबट वास आदी निदर्शनास येत होत्या, तर जुगारींसाठी हे हक्काचे ठिकाण झाले होते. शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने हे सर्व प्रकार घडत असल्याचे काही माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. ज्ञान घेण्याच्या पवित्र ठिकाणी अवैध घटना घडत असल्याने माजी विद्यार्थ्यांनी शालेय परिसर पत्र्यांच्या माध्यमातून बंद केला आहे. तसेच आक्षेपार्ह घतना टाळण्यासाठी आळीपाळीने पहारा देण्याचेही नियोजन केले आहे.

आम्ही लहानपणी येथेच शिक्षण घेतले आहे. यामुळे या शाळेबद्दल आम्हाला आस्था आहे. सध्या लॉकडाउनमधील परिस्थिती भीषण आहे. येथे अनेक गैरकृत्य होतात. त्यामुळे आम्ही मित्रांनी शाळेच्या पुढच्या भागाला पत्रे लावले आहेत.- बाळा बोस, माजी विद्यार्थी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी