शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

आधीच नुकसान, त्यात चोरट्यांचा त्रास

By admin | Updated: August 6, 2016 00:55 IST

दुकानदार त्रस्त : गोदाघाट परिसरात संधीसाधूंचा उपद्रव; भुरट्या चोरट्यांची चांदी

नाशिक : गोदावरीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असतानाच उरल्या सुरल्या सामानांवरही चोरटे हात साफ करीत असल्याने दुकानदारांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या दुकानात शिरून चोरट्या महिला साहित्य हातोहात लंपास करीत असल्याच्या घटना घडत आहेत. पुराच्या पाण्यात व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवस दुकाने पाण्याखाली असल्यामुळे दुकानातील साहित्य वाहून गेले, तर काही साहित्य वाचविण्यात यश आले. माल भिजल्यामुळे एकतर तो फेकून द्यावा लागला तर काही विक्रेत्यांनी भिजलेला माल मिळेल त्या किमतीत विकण्यास सुरुवात केली आहे. निदान थोडेफार पैसे मिळतील या आशेने भिजलेला माल दुकानात तर काहींनी रस्त्यावर मांडला असताना त्यांना चोरट्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. पंचवटीतील मुठे लेनमधील श्रीराम वस्त्र भांडारचे संचालक किरण सुधाकर धारवळे यांचे ड्रेस मटेरियल, रेडिमेड ड्रेस, साड्यांचे दुकान आहे. पुराच्या पाण्यात दुकानातील कपडे वाहून गेल्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. उरला सुरला माल त्यांनी मिळेल त्या किमतीला विकण्यास सुरुवात केली; मात्र रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून दुकानातील माल चोरून नेला. असाच अनुभव गोदाघाटावरील चहा दुकानदार रावसाहेब राऊत यांनी बोलून दाखविला. पुराच्या पाण्यात चहाची टपरी वाहून गेली मात्र सुरक्षित ठिकाणी ठेवलेले गॅस सिलिंडर चोरट्यांनी चोरून नेले. ज्या दुकानदारांनी दुकानाची साफसफाई करण्यासाठी उरलेले सामान बाहेर काढून ठेवले आहे, त्यातील साहित्य चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नारळाची पोती, तेलाच्या पिशव्या, काचेच्या बरण्या, तांदळाचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेले. काहींनी तर दुकानाचे पत्रे, लोखंडी अ‍ॅँगल, खुर्च्यादेखील चोरून नेल्या आहेत. आधीच वाहून गेलेल्या सामानामुळे दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झालेले असताना चोरट्यांनीदेखील हात साफ केल्याने दुकानदारांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.