शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आधीच डेंग्यूचा ससेमिरा, त्यात गढूळ पाणीपुरवठा

By suyog.joshi | Updated: July 17, 2024 18:20 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातही असाच गढूळ पाणीपुरवठा केला जात हाेता. या आठवड्यातही बागवानपुरा, काझी गढी, अमरधामरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 नाशिक : शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे काही भागांत होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. जेलरोड व जुने नाशिकच्या काही भागांत गेल्या आठवड्यापासून अशुद्ध व तांबूस रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याने आराेग्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या परिसरात महापालिकेने त्वरित उपाययोजना करून सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. काही भागांत पाणीपुरवठा अनियमित तसेच दुर्गंधीयुक्त होत असल्याने नागरिकांमध्ये पोटदुखी, जुलाब व उलट्या यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातही असाच गढूळ पाणीपुरवठा केला जात हाेता. या आठवड्यातही बागवानपुरा, काझी गढी, अमरधामरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट सिटीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पिण्याची जलवाहिनीच तुटल्याने या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीने निर्णय घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठा बंद पडणे, दूषित पाणीपुरवठा होणे, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होणे अशा विविध तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. 

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषणdengueडेंग्यूNashikनाशिक