वाचनालयात ‘अक्षरमृदगंध’ दरवळला

By Admin | Updated: September 27, 2016 01:45 IST2016-09-27T01:45:19+5:302016-09-27T01:45:46+5:30

वर्धापनदिन : विविध सांस्कृतिक कार्यक्रम

The 'alphabets' in the library | वाचनालयात ‘अक्षरमृदगंध’ दरवळला

वाचनालयात ‘अक्षरमृदगंध’ दरवळला

नाशिक : शासकीय कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाचनालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात अक्षरमृदगंध हा कवितेचा कार्यक्रम रंगला. याप्रसंगी प्रसिद्ध कवी ऐश्वर्या वाटेकर यांनी विविध कविता सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
शासकीय वाचनालयाच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, रवींद्र केडगे, राजेश मोरे आदि उपस्थित होते.
कवी पाटेकर यांनी ‘अक्षरमृदगंध’ या कार्यक्रमात ‘आईनी भाकर’ ही कविता सादर केली. वाचनालयाचे संस्थापक ल. गो. जोशी यांनी स्वागत केले. सचिव हेमंत पोद्दार यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन जयश्री वाघ यांनी केले. शुभदा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विवेक उगलमुगले, सारिका पाटेकर, मधुरा फाटक, जितेंद्र चव्हाण, प्रियंका बारगळ, चंद्रकांत महामिने, किशोर पाठक, रवींद्र मालुंजकर आदि उपस्थित होते.

Web Title: The 'alphabets' in the library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.